marathi diwali recipes

marathi diwali recipes

 

चिरोटे

 

साहित्य :

रवा, मैदा, साखर, तूप, आंबट दही, केशर किंवा खाण्याचा केशरी रंग.

कृती :

रवा व मैदा समप्रमाणात घ्यावा. त्यात चवीला मीठ व तेल किंवा तुपाचे मोहन घालून रवा व मैदा आंबट दह्यात भिजवावा. पिठाच्या दीडपट साखर घेऊन त्याचा दोन तारी पाक करावा व त्यात केशर किंवा खाण्याचा केशरी रंग घालावा व आवडत असल्यास लिंबू पिळावे. भिजविलेला रवा-मैदा कुटून त्याच्या किंचित जाडसर पोळ्या लाटाव्यात. त्यानंतर एका पोळीला तूप लावून, त्यावर दुसरी पोळी पसरावी व त्यालाही तूप लावावे. नंतर या जोडपोळीची साधारण एक इंच रुंदीची एकावर एक अशी घडी घालून, त्या संपूर्ण घडीचे एक इंच रुंदीचे चौकोनी तुकडे पाडावेत व ते तुकडे, पाहिजे असेल, त्याप्रमाणे चौकोनी किंवा लांबट लाटून, तुपात तळावेत व साखरेच्या पाकात सोडावेत. नंतर बाहेर काढून उभे करून ठेवावेत. पाक गरमच असावा. या प्रमाणेच सर्व पोळ्यांचे चिरोटे करावेत.

 

 

 

More Posts Related to marathi diwali recipes

  • marathi world
  • marathi diwali recipes
  • recipes for kids in marathi
  • upvas recipes in marathi
  • karanji recipe in marathi
  • thalipeeth recipe in marathi
  • cutlet recipe in marathi
  • ragda patties recipe in marathi
  • marathi recipes in english
  • marathi menu recipes
  • 2013 m4marathi. All rights reserved.