marathi cake recipes

Marathi cake recipes

रव्याचा केक साठी लागणारे साहित्य:

 1. १ वाटी रवा
 2. १ वाटी दही
 3. १ वाटी दूध 
 4. १ वाटी साखर
 5. १-२ चमचे तूप
 6. १ चिमूटभर बेकिंग सोडा
 7. वेलचीपूड / दालचिनी पावडर
 8. सुकामेवा
 9. बेक करण्यासाठी पसरट ओव्हन सेफ भांडेपूर्व तयारी 
रवा, दही, दूध, साखर, तूप एकत्र करून हे मिश्रण १५ ते २० मिनीटे फेटून घ्यावे . साखर व्यवस्थित विरघळेल याची काळजी घ्यावी
आणि मिश्रण २-३ तास झाकून ठेवावे .

कृती:
१) २-३ तासांनी ओव्हन ३७५ F (१९० C) प्रिहीट करायला लावा .

२) मधल्यावेळात ओव्हनसेफ भांड्याला तूपाचा हात लावून घ्या.

३) नंतर १ चमचा पाण्यात चिमटीभर बेकिंग सोडा घालावा, मिक्स करून फेटलेल्या मिश्रणात तो टाकून मिश्रण २-३ मिनीटे ढवळून घ्यावे.
४) मिश्रण ओव्हनसेफ भांड्यात ओतावे. वरून काजू बदाम पिस्त्याचे तुकडे पसरावे. आणि ३७५ F ( १९० C) वर १८ ते २० मिनीटे बेक करावे.

५) केकच्या कडा ब्राऊन रंगाच्या होतात तसेच केकचा छान गंध सुटला कि केक झाला असे समजावे. ओव्हन बंद करून २-३ मिनीटांनी केक बाहेर काढावा. 

 

तुमच्या साठी तुम्हाला आवडेल असा केक तयार झालेला असेल :) 

More Posts Related to marathi cake recipes

 • marathi cake recipes
 • cake recipes in marathi
 • chocolate cake recipe in marathi
 • veg cake recipe in marathi
 • cake recipes marathi
 • eggless cake recipe in marathi
 • cake recipes in marathi language